लोक भडकल्याने भाजप खासदार तेजस्वी सुर्या अक्षरशः पळून गेले…

0
180

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते मीटिंग हॉलमधून पळ काढतांना दिसत आहेत. तेथे उपस्थित लोक संतप्त झालेले दिसत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तेजस्वी यांना बंगळुरू दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

वास्तविक, व्हायरल झालेला व्हिडिओ 13 एप्रिलचा आहे. तेजस्वी एका जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनचे नेते तेजस्वी सूर्या, बसवनगुडीचे आमदार रवी सुब्रमण्यम आदी या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, काही लोकांनी तेजस्वी यांना प्रश्नोत्तरे विचारण्यास सुरुवात केली. श्री गुरू राघवेंद्र सहकारी बँक रेग्युलेरिटा च्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे हेच लोक बळी पडले आहेत. पैसे मिळण्यास विलंब का झाला, असा सवाल त्यांनी केला. यावेळी प्रश्न विचारणारे लोक संतप्त झाले. तेजस्वींच्या समर्थकांनी प्रश्न विचारणाऱ्यांना रोखण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. दरम्यान, तेजस्वी सूर्या सभेतून निघून जाऊ लागले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तेजस्वी हॉलमधून बाहेर जात असल्याचे दिसत आहे. त्यांचे समर्थक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. काही स्त्री-पुरुष प्रश्न विचारताना दिसत आहेत. तेजस्वींच्या समर्थकांनी लोकांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचाही आरोप आहे.

तेजस्वी सूर्या यांचा व्हिडिओ काँग्रेसने X वर शेअर करत लिहिले, भाजपचे तेजस्वी सूर्या हे पुन्हा एकवेळा आपतकालीन दरवाजाच्या माध्यमातून ते जमावापासून पळून गेले. तेजस्वी सूर्या निवडणुकीदरम्यान मतदारांवर हल्ला करतात आणि त्यांच्याशी दुर्व्यवहार करत आहेत, हा त्यांचा अहंकार आहे. त्यांनी आता आपली मर्यादा ओलांडलेली आहे. मतदारांनी आता त्यांना धडा शिकवण्याची योग्य वेळ आलेली आहे.