पीएमपीएमएल बसले धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास औंध येथे घडली.
संजय भोला राम (वय 43, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सोनूकुमार संजय राम (वय 22) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक गौतम अजगरे (रा. निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनूकुमार यांचे वडील संजय राम हे औंध येथे रस्त्याने पायी चालत जात होते. पादचारी मार्गाने जात असताना त्यांना पीएमपीएमएल बसने धडक दिली. हा अपघात पादचारी मार्गावर झाला. त्यामध्ये संजय यांचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.











































