चढ्या दराने आयपीएलच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

0
468

चढ्या दराने आयपीएलच्या तिकीटाची विक्री करणाऱ्या दोघांना चिचंवड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.10) चिंचवड येथे चापेकर चौकात केली गेली.

चेतन नामदेव पाटील (वय 25 रा.दिघी) व सचिन विनोद कुंभार (वय 21 रा. निगडी) यांना अटक केली आहे. याप्रकरणी आकाश विजय साळवी (वय 25 रा.दिघी) यांनी चिचंवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी आयपील मॅचच्या तिकीटांचा साठा करून ते तिकीट मुळ रकमे पेक्षा जास्त रकमेने विकत काळा बाजार करत होते. फिर्यादी यांना ही विकण्याचा प्रयत्न करुन 92 हजार 200 रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडे याची तक्रार करताच पोलिसांनी आरोपीना अटक केले आहे,