मतदार जागृती साठी निगडीतील तीन युवक करणार निगडी ते श्रीशैलम असा ८०० किलोमीटरचा सायकल प्रवास

0
200

मतदानासंदर्भात मतदार जागृती मोहिमेअंतर्गत इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे निगडी भक्ती शक्ती ते श्रीशैलम आंध्र प्रदेश अशी सुमारे 800 किलोमीटरची सायकल मोहीम अंतर्गत श्रेयस पाटील रमेश माने आणि सुनील चव्हाण यातील धुरंदर सायकल पटूंनी आज दिनांक 6 एप्रिल रोजी निगडी येथील भक्ती शक्ती येथून प्रस्थान केले ,

त्यांचा पुढील प्रवास खालील प्रमाणे राहणार आहे.
दिवस 1- निगडी ते मोहोळ २३७ किमी
दिवस २- मोहोळ ते गाणगापूर १३५ किमी
दिवस ३- गाणगापूर ते गंडेड १६० किमी
दिवस ४- गंडेड ते मनानुर १४५ किमी
दिवस ५- मनानुर ते श्रीशैलम ७५ किमी

मोहिमेअंतर्गत ते विविध संस्थांना तसेच कॉलेजेसला भेट देणार आहेत आणि मतदान करण्यासंदर्भात जनजागृती करणार आहेत असे इंडो अथलेटिक्स सोसायटीचे सदस्य गजानन खैरे यांचा तर्फे सांगण्यात आले, याप्रसंगी गणेश भुजबळ पाटील, अजित पाटील, अमित पवार, अजित गोरे, संतोषजी नखाते, गिरीराज उंमरीकर उपस्थित होते.