नंदकुमार मुरडे लोकमान्य टिळक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित

0
152

पिंपरी (दिनांक : ०५ एप्रिल २०२४) ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिलासा संस्था, कलारंजन प्रतिष्ठान, संवेदना प्रकाशन, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, कलांगण ट्रॉफीज तसेच शब्दधन काव्यमंच या संस्थांच्या वतीने एस के एफ युनियन सभागृह, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक ०४ एप्रिल २०२४ रोजी लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, सुरेश कंक, सुभाष चव्हाण, मधुश्री ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड, संगीता जोगदंड, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर तसेच पिंपरी – चिंचवड परिसरातील अनेक मान्यवर साहित्यिकांची सभागृहात उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना नंदकुमार मुरडे यांनी, “एक सामान्य रसिक म्हणून समाजात वावरताना समाजातील सामान्य माणसांमध्ये मी ईश्वर शोधत गेलो. समाजातील सकारात्मकता आणि सात्त्विक वृत्ती माझ्यात संक्रमित होत गेली. रिप्लेच्या ‘बिलीव्ह इट ऑर नॉट’ अशा उत्तमोत्तम साहित्यकृतींचा माझ्या लेखनावर कळतनकळत प्रभाव पडला. मानवीमूल्ये जपणे हे माझे जन्मसिद्ध कर्तव्य आहे!” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले.