दि 2 एप्रिल (पीसीबी )- राष्ट्रवादी काँग्रसमध्ये फूट पडल्यानंतर मूळ पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेला आहे. हातातून पक्ष गेल्यानंतर आठ महिन्यांतच आपला पक्ष उभा केला. निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवारांनी लोकसभा निडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटले आहेत. लोकसभेसाठी त्यांनी मंगळवारी (ता. २ एप्रिल) आपल्या पक्षातील ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून यादी जाहीर केली आहे.
शरद पवार यांचा राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केलेली आहे. आता निवडणुकीसाठी पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत. पक्षप्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदी नेते राज्यभर तुतारी फुंकणार आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रचारकांच्या यादीत शरद पवार, सुप्रिया सुळे, पी.सी. चाको, जयंत पाटील, फौजिया खान, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण, सोनिया दुहान, राजेश टोपे, रोहित पवार, जयदेव गायकवाड, अशोक पवार, शशिकांत शिंदे, अरुण लाड, प्राजक्ता तनपुरे, सुनील भुसारा, नसीम सिद्दीकी, रोहित आर. पाटील, रोहिणी खडसे, मेहबूब शेख, सक्षणा सलगर, पूजा मोरे आदींचा नेत्यांचा समावेश आहे.