सुनिल तटकरे रायगड मतदारसंघातून, अजित पवार यानी केले जाहीर

0
223

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडली. महायुती म्हणून आमचे ४८ आमदार उभे राहणार आहेत अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली. लोकसभा निवडणुकीत काय रणनीती असेल या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. ज्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली. बुधवारीही या संदर्भात बैठक होणार आहे असंही सुनील तटकरेंनी सांगितलं.

आमची आमदारांची बैठक झाली. आम्ही एकत्र चर्चा करुन महायुतीच्या ४८ जागांबद्दल महाराष्ट्रात कुणी कुठे जागा लढवायच्या त्याचं ८० टक्के काम झालं आहे. आता मी सांगतो की ९९ टक्के जागावाटपाचं काम फायनल झालं आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवार दिले आहेत. आज मी पहिली जागा जाहीर करतो आहे. रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभा लढवतील ही माहिती अजित पवार यांनी दिली. मुख्य पक्ष आणि घटक पक्ष मिळून ४८ जागा लढवत आहोत. शिवाजीराव अढळराव यांचा आज पक्ष प्रवेश होणार आहे. तो प्रवेश झाल्यानंतर दुसरी जागा मी तिथे जाहीर करेन. बाकी जागा २८ मार्चला तुम्हाला महायुतीच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.