१२ तारखेला १२ वाजता बारामतीत…

0
214

बारामती, दि. २4 (पीसीबी) -बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी भूमिका जाहीर केली आहे. मी बारामती मतदार संघातून विचारपूर्वक निवडणूक रिंगणात उतरलो आहे. यामुळे बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईत आता विजय शिवतारे आले आहेत. येत्या काळात कुठलाही दबाव माझ्यावर आणला तर मी निवडणूक रिंगणातून माघार घेणार नाही, असे सांगत १२ एप्रिलला १२ वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन वेळा झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वेगळी भूमिका त्यांनी रविवारी मांडली. बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जाहीर केली.

शिवतारे यांनी रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर लोकसभा लढवण्याचा निर्णय जाहीर केला. १२ एप्रिलला १२ वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवतारे यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यासोबतच येत्या काळात कोणाच्या कसल्याच धमकीला घाबरणार नसल्याचे सांगत निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले.