शोरूम मधील कर्मचाऱ्याने केला तीन लाखांचा अपहार

0
327

बाणेर, दि. २१ (पीसीबी) – वाहनांच्या शोरूम मध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने तीन लाख रुपयांचा अपहार केला. ही घटना 2 ऑक्टोबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत टाटा गारवे कार्स शोरूम, बाणेर येथे घडली.

लक्ष्मण बापू पवार (रा. शिवणे, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी दत्तात्रय बबन जाधव (वय 49, रा. शिंदे वस्ती, ता. मुळशी) यांनी 20 मार्च रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे बाणेर येथील टाटा गारवे शोरूम मध्ये काम करतात. शोरूम मधील रोख रक्कम तीन लाख चार हजार 840 रुपये शोरूमच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी लक्ष्मण याच्याकडे देण्यात आली होती. त्याने त्या रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.