भाजी खरेदीसाठी गेलेल्या वृद्धाचा मोबाईल पळवला

0
519

पुणे, दि. २१ (पीसीबी) – आठवडे बाजारात भाजी खरेदीसाठी गेलेल्या वृद्ध व्यक्तीचा मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) सायंकाळी सव्वासात वाजता ताथवडे येथे घडली.

रखमाजी दत्तू साळुंखे (वय 62, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथे मंगळवारी आठवडे बाजार भरतो. बाजारात फिर्यादी साळुंखे भाजी खरेदीसाठी गेले होते. त्यांनी शर्टच्या वरच्या खिशात ठेवलेला 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने काढून चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.