धक्कादायक… मुलीचा खून करून बापाने घेतला गळफास, लातूर हादरले

0
362

लातूर – शहरातील मोतीनगर परिसरात बुधवारी सकाळी एकाने आपल्या सहा वर्षीय मुलीची बेडशीटने गळफास देऊन हत्या केली व त्यानंतर पुन्हा त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शहरातील अभय लखन भुतडा (वय ३५) याचे मोतीनगर परिसरात हॉटेल आहे. हॉटेल मधून मुलीला शाळेत सोडून येतो म्हणून तो घरी गेला.

मोतीनगर परिसरात त्याचे मोठे घर आहे. त्यावेळी घरी पत्नी नव्हती. कोणत्या कारणामुळे त्यांनी आपल्या सहा वर्षाच्या मुलीला बेडशीटने गळफास दिला व हत्या केली हे कळू शकले नाही. त्यानंतर त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी शवविच्छेदन करून दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे मोती नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.