मावळ, दि. २० (पीसीबी) – सतत कामे सांगतो म्हणत कंपनी मॅनेजर वर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे,ही घटना मंगळवारी (दि.19) बेबडओहळ, मावळ येथे घडली आहे.
याप्रकरणी किरण मानसिंग भोसले (वय 47 रा.मावळ) यांनी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कुमार ओझरकर (वय 25 रा.शिवणे, मावळ) व एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या घटनेत सुधिर मच्छिंद्र अडसूळ (वय 47) हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुमार हा मानेग्रो कंपनीत काम करतो. तेथे च अडसूळ हे मॅनेजर पदावर काम करतात. यावेळी अडसूळ हे कंपनीतील कामे सतत सांगत असतातात याच रागातून कंपनी वरून घरी जात होते. यावेळी आरोपीने रागाने स्टील रॉडने डोक्यावर जोरात मारून गंभीर जखमी केले,यात अडसुळ यांची कवटी फ्रॅक्चर झाली आहे. यावरून शिरगाव परंदवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.