कुरुळी, दि. १७ (पीसीबी) – अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्यात गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 16) रात्री पावणे अकरा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे घडला.
संतोष रामदास बाळसराफ (वय 40, रा. कडाचीवाडी, चाकण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी रोहित सुनील पांढरकर (वय 29, रा. चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दाजी संतोष हे त्यांच्या दुचाकी (एमएच 14/जीई 3801) वरून पुणे-नाशिक महामार्गावरून पिंपरी येथून चाकण येथे घरी जात होते. कुरुळी येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात संतोष रस्त्यावर पडले. ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता तसेच अपघाताची माहिती न देता आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या संतोष यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.









































