फेक न्यूज ला आळा बसणार, ‘मिथ वर्सेस रिअ‍ॅलिटी’ मोहिम चालवणार

0
162

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची मागील बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती. अखेर आज (१६ मार्च) रोजी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशात १९ एप्रिल पासून सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुकांची धुमाळी पाहायला मिळणार आहे. रम्यान या लोकसभा निवडणुकीत चुकीची माहिती पसरु नये यासाठी निवडणुक आयोगाकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यामातून मतदारांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी फायदा होतो. तसेच लोकांकडे याच्या माध्यमातून टीका करण्याचा अधिकार देखील आहे. मात्र तुम्ही खोट्या बातम्या पसरवणे योग्य नाही. अफावा पसरवण्याबद्दल सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य निवडणुक आयुक्त म्हणाले. तसेच या आगामी निवडणुकीत काही नवीन गोष्टी देखील पाहायला मिळतील मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, आयटी कायद्याच्या कलम ६९ आणि ७९ (३) अंतर्गत प्रत्येक राज्यातील प्रशासनाला सोशल मीडिया पोस्ट हटवण्यास सांगण्याचे अधिकार आहेत. यासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले काही ठिकाणी केले जात आहेत.

सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांना योग्य माहितीच्या आधारे उत्तर दिलं जाणार आहे. कोणी खोटी माहिती पसरवत असेल आणि त्याच्या माध्यमातून वातावरण दुषित करत असेल तर आम्ही देखील त्याविरोधात मैदानात उतरू असेही मुख्य निवडणुक आयुक्त म्हणाले. आम्ही लवकर आमच्या वेबसाईटवर ‘मिथ वर्सेस रिअ‍ॅलिटी’ ही मोहीम लाँच करणार आहोत. ही खोटी माहिती पसवली जात आहे आणि हे सत्य आहे अशा स्वरूपात यामधून माहिती दिली जाईल. खोटी माहिती पसरवली जात असेल तर त्याबद्दलचं सत्य समोर आणलं जाईल. आम्ही लोकांना फेक न्यूज बद्दल शिक्षीत करू असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी खोटी माहिती पुढे फॉरवर्ड करण्यापूर्वी ती एकदा तपासून पाहिली पाहण्याचा सल्ला देखील मुख्य निवडणूक आयुक्तांनी नागरिकांना दिला.