- हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा; हॉकी हरयाणाचा आसाम हॉकीवर 15-0असा विजय
पुणे, दि. 16 (पीसीबी): दीपिकाने हॅटट्रिकसह पाच गोल केल्याने 14 व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेत हॉकी हरियाणाने आसाम हॉकीचा 15-0 अशा फरकाने पराभव केला. नेहरूनगर, पिंंपरी येथील ध्यानचंद हॉकी स्टेडियवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात शर्मिला देवी, महिमा चौधरी आणि उदिताने प्रत्येकी दोन गोल करताना सांघिक खेळ उंचावण्यात मोलाचे योगदान दिले
दिवसातील पहिला सामना (पूल डी) हॉकी हरयाणाने गाजवला. दीपिकाने (दुसर्या, 40व्या, 42व्या, 49व्या आणि 56व्या मिनिटाला) गोल पंचक लगावताना प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीची दाणादाण उडवली.
सेट पीसमधून सर्वोत्तमखेळासाठी ओळखल्या जाणार्या दीपिकाने तीन मैदानी गोल करण्याबरोबरच दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर केले. भारतीय महिला हॉकीमधील भविष्य म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.
शर्मिला (दुसर्या आणि 35व्या), महिमा (15 आणि 47व्या), उदिता (32 आणि 36व्या मिनिटाला पीसीद्वारे) प्रत्येकी दोन तर नेहा गोयल (आठव्या), नवनीत कौर (26व्या), एकता कौशिक (44व्या) आणि ज्योती (50व्या) यांनी प्रत्येकी एक गोल करताना गोलसंख्या 15वर नेली.
उदितानेही सेट पीसच्या माध्यमातून पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन्ही गोल सेट पीसमधून केले.
शुक्रवारच्या पहिल्या विजयामुळे हॉकी हरियाणाने पूल डीमध्ये तीन गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. ली पुडुचेरी हॉकी हा या ग्रुममधील आणखी एक संघ आहे.
पूल ई सामन्यात, दिप्ती लाक्रा (पाचव्या आणि 12व्या मिनिटाला), दीपी मोनिका टोप्पो (10 आणि 51व्या मिनिटाला) आणि अटेन टोप्नोच्या (12 आणि 34व्या मिनिटाला) प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर हॉकी असोसिएशन ऑफ ओदिशाने गोवन्स हॉकीवर 9-1 अशी मात केली.
याशिवाय जीवन किशोरी टोप्पो (29व्या मिनिटाला), नीतू लाक्रा (57व्या मिनिटाला) आणि अनुपा बारला (60व्या मिनिटाला) यांनीही ओदिशा संघाकडून गोल केले.
गोवन्स हॉकीकडून एकमेव गोल गीता राठोडने 47व्या मिनिटाला केला. तो मैदानी गोल होता.
हॉकी असोसिएशन ऑफ ओदिशाचा स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. या विजयासह त्यांनी गटात अव्वल स्थान मिळवले. पूल ईमध्ये हॉकी चंडिगड आणखी एक संघ आहे.
दिवसाच्या उत्तरार्धात, पूल एफच्या सामन्यात हेवीवेट हॉकी पंजाबने हॉकी राजस्थानचा 11-2 असा पराभव केला.
सरबदीप कौरची (15, 39 आणि 56व्या मिनिटाला) गोल हॅटट्रिक आणि तरनप्रीत कौर (पहिला, 42व्या मिनिटाला), किरणदीप कौरचे (18 आणि 45व्या मिनिटाला) प्रत्येकी दोन हे पंजाबच्या मोठ्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
14 व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर पुनित बालन ग्रुप आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असोसिएट स्पॉन्सरआहेत. युनियन बँक ऑफ इंडियासह क्रीडा व युवक व्यवहार संचालनालय, महाराष्ट्र यांच्या पाठिंब्याने होत असलेल्या स्पर्धेतील इतर प्रायोजकांमध्ये एमक्युअर सीएसआर, डी. वाय. पाटील (मेडिकल पार्टनर) आणि द ऑर्किड (हॉस्पिटॅलिटी पार्टनर) यांचा समावेश आहे.
निकाल –
पूल-डी: हॉकी हरियाणा: 15 (शर्मिला देवी 2री, 35वी; दीपिका 2री, 40वी – पीसी., 42वी, 49वी, 56वी – पीसी; महिमा चौधरी 15वी, 47वी; नेहा गोयल 8वी; नवनीत कौर, 23वी, 23वी, पीसी; उदिता 32वी, 36वी पीसी; एकता कौशिक 44वी, ज्योती 50वी) विजयी वि. आसाम हॉकी: 0. हाफटाईम: 5-0
पूल-ई: हॉकी असोसिएशन ऑफ ओदिशा: 9 (दिप्ती लाक्रा 5वी – पीसी; दीपी टोप्पो 10वी, 51वी – पीसी; अटेन टोप्नो – 12वी पीसी, 34वी; दीप्ती लाक्रा 12वी; जीवन किशोरी टोप्पो 29वी; नितू लाक्रा 57वी; अनुपा बार्ला 60वी) विजयी वि. गोवन्स हॉकी: 1 (गीता राठोड 47वी). हाफटाईम: 5-0
पूल-एफ: हॉकी पंजाब: 11 (कौर तरनप्रीत 1ली, 42वी – पीसी; कौर राजविंदर 9वी; सरबदीप कौर 15वी, 39वी; 56वी; किरणदीप कौर 18वी – पीसी; 45वी; जोतिका कलसी 22वी- पीसी. बलजीत कौर 41वी; प्रियंका 51वी पीसी) विजयी वि. हॉकी राजस्थान: 2 (कौर राजवीर 19 व्या; रीना सैनी 36 व्या मिनिटाला). हाफटाईम: 5-1