हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) : टास्क पूर्ण केल्यास दुप्पट पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची दोन लाख 40 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 23 जुलै 2023 ते 28 जुलै 2023 या कालावधीत नेरे दत्तवाडी येथे घडली.
याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना टेलिग्रामवर एक चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना टास्क देऊन ते टास्क पूर्ण केल्यास दुप्पट पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादी कडून दोन लाख 40 हजार रुपये त्यांची फसवणूक करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.












































