अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक छळ केल्याचा मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात गुन्हा

0
242

कर्नाटक, दि. १५ (पीसीबी) : एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून भाजपचे दिग्गज नेते आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात बेंगळुरूमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या विरोधात POCSO आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेंगळुरूच्या सदाशिवनगर पोलिसांनी 17 वर्षीय एका मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एफआयआर दाखल करणारी महिला आणि तिची मुलगी एका फसवणुकीच्या प्रकरणात मदत मागण्यासाठी येडियुरप्पा यांच्याकडे गेल्या असताना 2 फेब्रुवारी रोजी हा कथित लैंगिक अत्याचार झाला असल्याचे नमूद केले आहे.

या प्रकरणी येडियुरप्पा यांच्या कार्यालयातून एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या निवेदनात दावा करण्यात आला आहे की, संबंधित तक्रारदार महिलेने अनेकवेळा केल दाखल केली आहे. अशा 53 प्रकरणांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये संबंधित तक्रारदार महिलेने वेगवेगळ्या कारणांसाठी केस दाखल केली आहे. या महिलेला अशा तक्रारी करण्याची सवयच आहे, असे निवेदनात म्हंटले आहे.