पीएमटी बस प्रवासात महिलेची सोन्याची पाटली पळवली

0
179

पीएमटी बसने प्रवास करत असताना प्रवासी महिलेच्या हातातील एक लाख 32 हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली दोघांनी पळवली. ही घटना सोमवारी (दि. 11) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कासारवाडी, नाशिक फाटा येथे घडली.

याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक फाटा, कासारवाडी येथून पीएमटी बसने प्रवास करत होते. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील एक लाख 32 हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.