वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
331

निगडी, दि. १४ (पीसीबी) – अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी देहूफाटा ते निगडी मार्गावर घडला.

विरण स्वामिनाथन स्वामी (वय 38, रा. देहूरोड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विक्रम वाकळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरण हे मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास देहूफाटा येथून निगडीच्या दिशेने येत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये विरण हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.