पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवडगावातील प्राचीन शिवालय श्री धनेश्वर मंदिर आणि विठ्ठल महादेव मंदिराचा आणि परिसराचा कायापालट केला जाणार आहे. त्याचप्रमाणे केशवनगर येथील बास्केट ब्रीज, पवना नदीकडेला सीमाभींत उभारण्याचे काम केले जाणार आहे. या सर्व कामांची आज महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि या भागातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्यासोबत मी पाहणी केली. कामांचा विकास आराखडा पाहून कामे कशी केली जाणार आहेत याची माहिती घेतली. अधिकाऱ्यासोबत चर्चा करून काम उच्च दर्जाचे करण्याची सूचना केली. ही कामे मुदतीच्या आत पूर्ण करण्यास सांगितले. तसेच श्री धनेश्वर मंदिर येथील गोशाळेला भेट देऊन काही क्षण गोमातेसोबत घालवले. त्याचप्रमाणे पवना नदीकडेला १२ मीटर रुंदीचा रस्ता करण्यासंदर्भात स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांसोबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी माजी नगरसेवक श्री. सुरेश भोईर, श्री. राजेंद्र गावडे, श्री. मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेविकी श्रीमती अश्विनीताई चिंचवडे, धनेश्वर प्राचीन शिवालय अध्यक्ष श्री. कैलास काका साठे, श्री. आवेश चिंचवडे, श्री. गणेश मिरजकर, श्री. विलास चिंचवडे, श्री. बाबा भोईर, श्री. आबा गावडे, श्री. ज्ञानेशवर गावडे, श्री. भिवाजी गावडे, श्री. राजेद्र भोईर, श्री.गणेश गावडे, श्री. चंद्रकांत थोरात, श्री. जिजाराम गावडे, श्री. पाटीलबुवा चिंचवडे, माजी स्वीकृत नगरसेवक श्री. विठ्ठल भोईर, श्री. योगेश चिंचवडे, श्री. दीपक भोईर, श्री. संग्राम चिंचवडे, श्री. विजय गावडे, श्री. संतोष निंबाळकर, श्री. सुजित गावडे, श्री. सुरज बेंद्रे , श्री. शिवम गावडे, श्री. प्रशांत आगज्ञान, श्री. अजय तिकोणे, श्री.विलास भोईर, श्री.हेमंत भोईर, श्री. मयुरेश मिरजकर, श्री. अनिल गावडे, श्री. शुभम ढवळे स्वप्निल वस्ते आदी उपस्थित होते.