नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – अश्लील, असभ्य आणि पोर्नोग्राफिक सदृश्य साहित्य प्रसारित केल्याबद्दल केंद्र सरकारने गुरुवारी १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. तसेच काही सोशल मीडिया अकाऊंटसही बंद केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, अश्लील साहित्य दाखिवणारे १८ ओटीटी प्लॅटफॉर्म, १९ संकेतस्थळ, १० ॲप्स (गुगल प्ले स्टोअरवरील सात आणि ॲपल स्टोअरवरील तीन) आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंटला बंद करण्यात आलं आहे. आता देशभरात कुठेही या साईट्सना पाहता येणार नाही.