धंदा करायचा असेल तर हप्ता द्या म्हणून धमकावणाऱ्या तथाकथीत भाईला अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

चिखली, दि. १३ (पीसीबी) :- आत्ताच जेलमधून आलो आहे. तुम्हाला येथे धंदा करायचा आहे तर दर महिन्याला मला हप्ता द्या नाही तर जिवानीशी मारून टाकीन अशी धमकी देणाऱ्या तथाकथीत भाईला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 18 फेब्रुवारी रोजी साने चौक, चिखली येथे घडली होती.

अस्लम बशीर मुजावर (रा. चिखली) असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.12) शिवाजी गंगाधर उनवने (वय 40 रा.चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे साने चौक येथे क्लासीक मेन्स वेअर हे कपड्याचे दुकान आहे. आरोपी थेट दुकानात आला व त्याने फिर्यादीला , मी आत्ताच जेलमधून बाहेर आलो आहे, मी साने चौकाचा भाई आहे. तू य़ेथे खूप कमावलेस आता तू मला 10 हजार रुपये दे व दर महिन्याला एक हजार रुपये दे अशी मागणी केली. तसेच हप्ता दिला नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या शेजारी असलेल्या ज्यूस सेंटर चालकाला देखील धमकावून दर महिन्याला 3 हजार रुपयांचा हप्ता मागितले व धमकी दिली. यावरून चिखली पोलिसांनी आरोीला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article