ड्रेनेज मध्ये अढळले मृत पुरुष जातीचे अर्भक, पिंपरीतील धक्कादायक प्रकार

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) :- पिंपरी येथील एका गल्लीमधील ड्रेनेजमध्ये पुरुष जातीचे र्भक फेकण्यात आले होते.ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे, हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.12) गोकुळहॉटेलच्या पाठीमागच्या गुरुदत्त नगर येथे उघडकीस आला.

य़ाप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे पाच ते सहा महिन्याचे पुरुष जातीचे अर्भक मृत्यू घडवून अनण्याच्या उद्देशाने ड्रेनेजमध्ये टाकून देण्यात आले होते. या घटनेत अर्भकाचा मृत्यू झाला आहे. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस संबंधित महिलेचा शोध घेत आहेत.

Share This Article