अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
379

पुणे, दि. १२ (पीसीबी) – अज्ञात वाहनाने दुचाकीला ओव्हरटेक करत असताना दुचाकीला जोरदार धडक दिली, या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.11) कासारवाडी येथे जुना मुंबई-पुणे महामार्गावर झाला.

या अपघातात रोहीतबाळासाहेब चव्हाण (वय 24 रा. जुनी सांगवी) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बाळासाहेब चव्हाण (वय 49 रा. जुनी सांगवी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात गाडी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा रोहीत व त्याचा मित्र निखील फंड हे दुचाकी वरून घरी जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली. यात रोहीत याचा मृत्यू झाला आहे तर निखील हा किरकोळ जखमी झाला आहे. मात्र वाहनचालक तेथे न थांबता पळून गेला, यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.