पार्ट टाईम जॉब चे आमिष दाखवून महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक

0
295

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – पार्ट टाईम जॉब चे आमिष दाखवून एका महिलेची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.1 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत चिंचवड गाव येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.11) फिर्याद दिली आहे. यावरून 963943598244 या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने सबंधित क्रमांकावरून व्हाट्सअप मेसेज केला. यात त्याने फिर्यदीला पार्ट टाईम जॉब चे आमिष दाखवले. फिर्यादी यांना टास्क देवून कमावण्याचे आमिष दाखवले. कमावलेले पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगून फिर्यादी यांची 5 लाख 40 हजार 499 रुपयांची फसवणूक केली आहे.चिंचवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.