भोसरी, दि. ११ (पीसीबी) – रिक्षा चालकाला विचारपूस करत असलेल्या महिलेला एका भरधाव दुचाकीस्वाराने जोरात धडक दिली. त्यामध्ये महिला जखमी झाली. ही घटना 2 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता पीएमटी बस थांबा, भोसरी येथे घडली.
याप्रकरणी जखमी 53 वर्षीय महिलेने 10 मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने मोशी येथील एका रुग्णालयात रक्त तपासणी केली होती. त्याचे रिपोर्ट आणण्यासाठी जात असताना महिला भोसरी मधील पीएमटी बस थांब्यावर आल्या. त्या एका रिक्षा चालकाकडे विचारपूस करत असताना एक दुचाकीस्वार भरधाव आला. त्याने फिर्यादी महिलेला जोरात धडक दिली. त्यात महिला जखमी झाल्या.त्यानंतर दुचाकीस्वार अपघाताच्या ठिकाणी न थांबता निघून गेला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.











































