माझ्या बायकोशी बोलतो काय म्हणत एकास बेदम मारहाण

0
345

आळंदी, दि. ११ (पीसीबी) -माझ्या बायकोशी बोलतोस काय, असा जाब विचारत एका मजुराला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास आळंदी येथे घडली.

प्रशांत सदाशिव इनामदार (वय 40, रा. आळंदी) असे मारहाण झालेल्या मजुराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माऊली वामनराव पपुले (रा. केळगाव, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इनामदार हे आळंदी येथून पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी लोखंडी पाईप घेऊन आला. त्याने इनामदार यांना अडवून ‘तू माझ्या बायको बरोबर बोलत आहे काय’ असा जाब विचारला. त्यावर इनामदार यांनी, ‘मी तुला ओळखत नाही. मी कशाला तुमच्या बायकोबरोबर बोलू’ असे म्हटले आणि पुढे चालू लागले. त्यानंतर आरोपीने इनामदार यांना लोखंडी पाईपने दोन्ही पायावर, हातावर बेदम मारहाण करून जखमी केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.