मोहननरमध्ये होणार दीड कोटींचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन

0
127

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून चिंचवड, मोहननगर येथील रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. एक कोटी 30 लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते शनिवारी झाले.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक नारायण बहिरवडे, माजी नगरसेवका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, राजूभाऊ दुर्गे, जगदीश शेट्टी, भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, गणेश लंगोटे, युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रुपेश कदम, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर, युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, युवा सेनाशहर प्रमुख माऊली जगताप, उद्योजक रवी नामदे, पिंपरी विधानसभा प्रमुख निखिल येवले, सागर पुंडे,अभिजीत पाटील,संजय जगताप आदी मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. मोहननगर मध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याची स्थानिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी खासदार बारणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. नगरविकास, खासदार स्थानिक निधीतून खासदार बारणे यांनी रस्त्यासाठी निधी मंजुर केला. त्या कामाचे आज भूमीपूजन झाले असून कामाला सुरुवात झाली आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, मी जरी आज एका पदावर काम करत असलो. तरी प्रथम मी एक सर्व सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे जनसेवक या नात्याने जनतेसाठी कामे करणे हे माझे सर्वात महत्वाचे काम समजतो. त्यातूनच प्रत्येक नागरिकाला उत्तम पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मी प्रयत्न करत असतो. या भागातील नागरिकांनी माझ्यावर प्रेम केले. साथ दिली. मतदान केले. आगामी काळातही माझ्यासोबत राहतील असा मला ठाम विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. देशाची जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे तिस-यावेळी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने काम करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकासाचा आलेख वाढत आहे. प्रलंबित प्रकल्प मार्गी लागत आहेत. राज्यात अनेत योजना राबविल्या जात आहेत. शहराला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न पुढील काळात मार्गी लावला जाईल. आगामी काळात नागरिकांच्या मागणीनुसार परिसराच्या विकासासाठी निधी दिला जाईल. निधी कमी पडू दिला जाणार आहे.