नोटीस पाठवल्याच्या कारणावरून मारहाण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

0
401

पिंपरी, दि. ४ मार्च (पीसीबी) – नोटीस का पाठवली अशी विचारणा करत दोन घटांमध्ये मारहाण घडली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.2) खराळवाडी, पिंपरी येथे घडली आहे,

याप्रकरणी सागर शिवाजी किल्लेकर (वय 42 रा.खराळवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार केतन थोरात (वय 30) व त्याचे चार सोबतीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारित म्हटले आहे की, फिर्यादी हे त्यांच्या मित्रा सोबत बोलत उभे असताना केतन व त्याचे साथीदारा आले .यावेळी केतन याने तू मला नोटीस का पाठवली म्हणत शिवीगाळ करत एका वस्तूने फिर्यादीला मारहाण केली.

तर केतन थोरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सागर किल्लेकर याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे, थेरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, किल्लेदार यांना नोटीस का पाठवली अशी विचारणा केल्याचा राग आल्याने आरोपीने सुरक्षा रक्षकाच्या हातातील काठीने मारहाण करत शिवीगाळ केली व सोसायटीमध्ये कसा राहतो ते बघतो म्हणत धमकी दिली. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखलकेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.