माझ्या हॉटेलवर चायनीज खायला येऊ नको, तुझी आई आम्हाला ओरडते

0
553

खेड, दि. ०३ (पीसीबी) – माझ्या हॉटेलवर चायनीज खायला येऊ नकोस, तुझी आई आम्हाला ओरडते, असे म्हणून दोघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री दहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली.

सोमनाथ दिलीप टोपे (वय 32, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश गारगोटे, कैलास कड (दोघे रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टोपे हे त्यांच्या घरासमोर असलेल्या चायनीज हॉटेलवर चायनीज खाण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी रुपेश गारगोटे याने फिर्यादीला तू माझ्या हॉटेलवर चायनीज खायला येऊ नकोस. तुझी आई आम्हाला ओरडते, असे म्हणून काउंटर जवळ ठेवलेला लोखंडे रॉड फिर्यादी यांच्या पायावर मारला. त्यामध्ये फिर्यादी जखमी झाले. त्यानंतर कैलास कड याने फिर्यादीस शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.