दुचाकीच्या धडकेत पादचारी मुलगी जखमी

0
330

आकुर्डी, दि. ०३ (पीसीबी) – भरधाव दुचाकीने एका पादचारी मुलीला धडक दिली. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास कॅम्प एज्युकेशन प्रेरणा माध्यमिक विद्यालय आकुर्डी येथे शाळेच्या गेट समोर घडली.

नर्मदा योगेश पाटील असे जखमी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी योगेश पाटील (रा. मोशी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी दुचाकीस्वार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी महिलेने तिच्या ताब्यातील दुचाकी भरधाव चालवली. निष्काळजीपणे दुचाकी चालवून रस्त्याने पायी जात असलेल्या नर्मदा पाटील हिला जोरात धडक दिली. त्यामध्ये नर्मदा हीच्या पायाला, हाताला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार महिला घटनास्थळावरून पळून गेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.