पिंपरी चिंचवड पोलिसांनी पकडले दोन कोटींचे एमडी ड्रग्स

0
427
Different drugs on the table. Addiction concept.

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडण्याच्या घटना समोर येत असतानाच पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील मोठी कारवाई करत तब्बल दोन कोटींचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स पकडले आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. 1) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथे करण्यात आली.

नमामी शंकर झा (वय 32, रा. निगडी. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथे रक्षक चौकाजवळ एक व्यक्ती एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून नमामी झा याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल दोन कोटी दोन लाख 10 हजार रुपये किमतीचे दोन किलो 20 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे. हे ड्रग आरोपीने विक्रीसाठी आणले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.