खासदार मेधाताई कुलकर्णी यांना मातृशोक

0
257

पुणे, दि. १ (पीसीबी) : राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती मधुकर पाटणकर (वय-८७) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम शाळेतील त्या निवृत्त संगीत शिक्षिका होत्या. कोथरूड मधील जुन्या डॉक्टरांपैकी एक डॉ. मधुकर पाटणकर यांच्या त्या पत्नी होत्या.