खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक, ‘तिचा प्रवास’ कार्यक्रम रद्द

0
217

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – जिजाई प्रतिष्ठानतर्फे आयोजिततिचा प्रवास या प्रेरणादाई कार्यक्रमाचे आयोजन तूर्तास रद्द करण्यात आला आहे. राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती मधुकर पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यामुळे तिचा प्रवास २ मार्च रोजी सकाळी १० ते २ दरम्यान प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणारा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सर्व महिला भगिनींनी योची नोंद घ्यावी, असे प्रतिष्ठानच्या प्रमुख माजी स्थायी समिती अध्यक्षा आणि कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका सिमाताई सावळे यांनी कळविले आहे.