महिलांचा मतदानांचा टक्का वाढविण्यासाठी चिंचवडमध्ये विशेष माेहिम 

0
182
  • महिलांनी घेतली मतदान करण्याची शपथ 

पिंपरी, दि. २९ (पीसी बी) ः पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघात महिला मतदारांचे प्रमाण कमी आहे. समाज विकास विभागामार्फत महिलांना ईव्हीएमचे प्रशिक्षण देण्यात आले. आपल्या कुटुंबातील महिलांची मतदार नाेंदणी झाली नसेल तर ती नाेंदणी करावी. महिलांचे लाेकशाहीमध्ये माेठे स्थान आणि याेगदान आहे. महिला मतदारांचा टक्का वाढावा, यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी महिलांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. 

महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 33 मावळ लोकसभा अंतर्गत 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या शीघ्र निदान शिग्रो उपचार या उपक्रमात लोकशाहीचा जागर व लोकशाही संदर्भात महिलांना शपथ देण्यात आली. यावेळी समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांच्यासह आदी अधिकारी, महिला माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या. 

राज्यात स्त्री-पुरुष मतदारांचे प्रमाण 925 इतके आहे. महिलांचा मतनाेंदणी आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी व मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या https://www.eci. gov.in या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाइन अँपवर ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करता येत आहे. 

महिलांनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढे यावे. आपल्या परिचयातील महिलांना देखील मतदार नोंदणी करण्याबाबत माहिती द्यावी. या कार्यक्रमाला महिलांची माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती. त्यांनी मतदानाची शपथ घेतली.

आमागी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांचे प्रमाण वाढावे, यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये माेठ्या जनजागृती माेहिमेचे आयाेजन करण्यात येत आहे. तसेच महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी एसएमएस, आयव्हीआरएस काॅलिगसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध विशेष माेहिमा राबविण्यात येणार आहेत. पात्र महिलांनी मतदार नोंदणी करण्याबरोबरच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदान करावे.