गुजरात किनारपट्टीवरून २ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच विदेशी नागरिकांना अटक

0
199

गुजरात, दि. २९ (पीसीबी)– इराणच्या बंदरातून गुजरात किनाऱ्यावर नौकेद्वारे आणलेले तब्बल तीन हजार ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ भारतीय सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी जप्त केले. या प्रकरणी पाच विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हा आतापर्यंत जप्त करण्यात आलेला सर्वात मोठा साठा ठरला आहे.

अरबी समुद्रात भारतीय किनाऱ्यापासून आणि आंतरराष्ट्रीय सागरी सीमेपासून सुमारे ६० सागरी मैलावर नोंदणी नसलेली एक मासेमारी नौका मंगळवारी सकाळी अडवण्यात आली. बोटीची तपासणी केली असता त्यात तीन हजार ११० किलो चरस, १५८.३ किलो ‘क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन’ आणि २४.६ किलो हेरॉइनसदृश पदार्थ जप्त करण्यात आला.  ‘रास अवाद गुड्स कंपनी, पाकिस्तान’ असा शिक्का असलेल्या पाकिटांमध्ये हे अमली पदार्थ ठेवण्यात आल्याची माहिती ‘एनसीबी’ने दिली आहे.

इराणच्या बंदरातून गुजरात किनाऱ्यावर नौकेद्वारे आणलेले तब्बल तीन हजार ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ भारतीय सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी जप्त केले. या प्रकरणी पाच विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हा आतापर्यंत जप्त करण्यात आलेला सर्वात मोठा साठा ठरला आहे.