किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, दोघांना अटक

0
548

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – हटकले या किरकोळ कारणावरून दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले आहे. यावरून चिचंवड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, हा सारा प्रकार सोमवारी (दि.26) चिचंवड, वाल्हेकरवाडी येथे घडली आहे,

याप्रकरणी अरूण काशिनाथ लोकरे (वय 53 रा.वाल्हेकरवाडी) यांनी चिंचवड पोलीस ठाम्यात पिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजय जालिंदर टाक (रा. चिंचवड), अविनाश सिताराम गायकवाड (रा. वाकड) यांना अटक केली आहे.यात आकाश अरूण लोकरे (वय 21) हा जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरा शेजारी राहणारी मुलगी तिच्या बहिण व आरोपी हे गप्पा मारत बसली होती. यावेळी आकाश हा कामावरून घरी येत होता. यावेळी त्याने शोजारी राहणाऱ्या मुलीला तु या पोरांसोबत दारु पीत बसली होती का असे विचारले असता त्याचा राग येवून आरोपींनी त्यांच्या जवळील कोयत्याने व लोखंडी दांड्याने डोक्यात वार करत गंभीर जखमी केले.