मावळ, दि. २७ (पीसीबी) – मध्यस्ती केली म्हणून घरात घुसून एकाला घरात घुसून मारहाण केली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.25) रात्री पाचाणे, मावळ येथे घडली.
सौरभ दत्तात्रय येवले (वय 26 रा. पाचाणे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी मंथन कदम (वय 22 रा. पाचाणे) व संदेश कदम (वय 24 रा. पाचाणे) यांना अटक केली आहे. तर विधीसंघर्षीत बालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना आरोपी हे फिर्यादीच्या घरी आले व त्यांनी तू भांडणात का पडलास, सोडवासोडवी का केली म्हणत फिर्यादी, फिर्यादीचे वडील यांना मारहाण करत गंभीर जखमी केले. यावरून शिरगाव पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.