चाकण, दि. २७ (पीसीबी) – कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.26) मेदनकरवाडी, चाकण येथे घडला आहे.
याप्रकरणी धनाजी आत्माराम चव्हाण (वय 44 रा. मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून पोलिसांनी कंटेनर चालक बेनाथ सुरतराम जाट (वय 30 रा. बोराडा, राजस्थान) याला अटक केली आहे,या अपघातात राणी दिपक गोसावी (वय 40 रा. मेदनकरवाडी) यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यातील कंटेनर घेवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत वेगाने कंटेनर चालवत होता. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या गोसावी यांच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. यात गोसावी खाली पडल्या व त्यांच्या डोक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. यावरून चाकण पोलीसांनी कंटेनर चालकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.










































