श्री क्षेत्र भगवानगड येथे सुमारे 26 कोटी रुपये खर्च करून हजारो लोकांच्या वर्गणीतून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भव्य आणि दिव्य संत ज्ञानेश्वर मंदिर बांधण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती देण्यासाठी श्री क्षेत्र भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री सानप महाराज यांनी राष्ट्रीय स्वयं संघाचे सरसंघ प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांची नगर जिल्ह्यामध्ये आले असता सदिच्छा भेट घेतली.
श्री क्षेत्र भगवानगड येथे येण्याचे निमंत्रण देण्यात आले डॉक्टर मोहन भागवत यांनी भगवान गडाची संपूर्ण माहिती डॉक्टर शास्त्री यांच्याकडून घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर बांधण्यात येत आहे त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले पुढील वर्षांमध्ये श्रीक्षेत्र भगवानगडाचा अमृत महोत्सव आहे यावेळी भारताचे पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यासहसरसंगचालक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भगवानगडावर येण्याचं निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार तथा श्री शेत्र भगवानगडाचे सचिव श्री गोविंद घोळवे यांनी दिली












































