पिंपरी, दि.२४ (पीसीबी) : अंतरराष्ट्रीय IPTEX आणि GRINDEX प्रदर्शन आणि GTI समिट 2024 चे उद्घाटन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संचालक एस. डी. गराडे यांच्या हस्ते आज दीपप्रज्वलनाने करण्यात आले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे भरलेल्या या प्रदर्शनात देश-विदेशातील गिअर उद्योगातील ७५ कंपन्यांचा सहभाग आहे.
गिअर उद्योगातीलच नव्हे तर वाहन आणि अन्य यंत्र उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी हे प्रदर्शन आणि येथे होणारी चर्चासत्रे मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास श्री. गराडे यांनी व्यक्त केला. यावेळी सहभागी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे प्रदर्शन येत्या २४ फेब्रुवारी पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. बंगळुरू येथील वर्गो कम्युनिकेशन्स अँड एक्झिबिशन प्रा. लि. हे या प्रदर्शनाचे संयोजक असून, गिअर टेक्नोलॉजी इंडिया (GTI), इंटरनॅशनल एक्स्पो ऑन ग्राइंडिंग अँड फिनिशिंग प्रोसेस (IPTEX) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
इंटरनॅशनल पॉवर ट्रान्समिशन एक्स्पो, गियर्स आणि मेकॅनिकल पॉवर ट्रान्समिशन उद्योगासाठी भारतातील एकमेव ट्रेड शो आणि व्यासपीठ आहे. एक्स्पोला अमेरिकन गियर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AGMA) आणि SME चेंबर ऑफ इंडिया यांचेही सहकार्य मिळाले आहे.
या सर्व कार्यक्रमामत वरील क्षेत्रांतील ७५हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. जे ऑटोमोबाईल, एरोस्पेस, संरक्षण उपकरणे, मरीन, मशीन टूल्स, मटेरियल हाताळणी, सिमेंट उद्योग यासारख्या ५० हून अधिक उद्योगांमधील व्यावसायिक, लघु व मध्यम उद्योजक तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील अभ्यागतांना नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन करतील.
या तीन दिवसीय कार्यक्रमात गियर टेक्नॉलॉजी इंडिया (GTI) – भारतीय गियर उत्पादन उद्योगासाठी एकमेव डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मसह एक विशेष शिखर परिषद देखील आहे. GTI समिटमध्ये अनेक सादरीकरणे, पॅनेल चर्चा, एक परिसंवाद आणि फायरसाइड चॅटचा उद्देश केवळ गियर उत्पादकांसाठी असेल आणि गियर उत्पादन उद्योगातील प्रख्यात वक्ते मार्गदर्शन करतील.
याशिवाय, भारताचा पहिलाच ‘ गियर मॅन्युफॅक्चरिंग फॉर बिझनेस आणि एक्सलन्स अचिव्हमेंट अवॉर्ड ‘ने भारतीय गीअर उद्योगातील प्रभावी कामगिरी करणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या कंपनीचा गौरव केला जाणार आहे