निगडी, दि. १६ (पीसीबी) – क्रिएटिव्ह अकॅडमीचा संस्था चालक नौशाद शेख याने अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आल्यावर आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने या संस्थेच्या अतिक्रमणावर शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) बुलडोझर चालविला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आठवड्यापूर्वीच त्याबाबत इशारा देताना अत्याचार करणाऱ्यांबाबत उत्तर प्रदेश पॅटर्न वापरण्याचा इशारा दिला होता. अनेक अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण ज्या हॉस्टेलमध्ये घडलं तेथील बरेचसे बांधकाम अनधिकृत असल्याची बाब उघडकीस आल्याने महापालिकेने ही कारवाई केली आहे.
शेख यांच्या निवासी शाळेत दहावी-बारावीचे १५० विद्यार्थी शिकत होते. अनेकदा मुलिंना नको ते काम सांगणे, लैंंगिक अत्याचार करण्याचे प्रकार उघडकिस आले. आजवर पाच मुलिंच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून अशा अनेक घटना असल्याची चर्चा आहे. दहा वर्षांंपूर्वी याच नौशाद शेख याला मुलिंच्या विनयभंग प्रकऱणात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शहर शिवसेनेने त्याच्या विरोधात आंदोलन केले होते. ठोस कारवाई न झाल्याने तो पिसटला आणि पुन्हा पुन्हा अत्याचार करू लागला. ब प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या या अवैध बांधकामावर कारवाईत महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त मनोज लोणकर, प्रभाग अधिकारी अमर पंडित यांंच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत कार्यकारी अभियंता आबा ढवळे, उपअभियंता दिनेश पाठक, कनिष्ठ अभियंता पंकज धेंडे आदींचा कारवाईत सहभाग होता.