अंतरवाली सराटी, दि. १५ (पीसीबी) – आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्याची चिंताजनक बाब आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली. अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यानंतर महंतांनी आग्रहाने जरांगेंनी पाणी पाजलं. पण, जरांगेची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पाणीही घोटवत नाही. त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत. जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे.
मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे. ‘पाणी घ्या’ म्हणत घोषणाबाजी सुरु आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज जरांगे यांच्या उपोषस्थळी दाखल झाले आहेत. तब्येत खालावली असल्याने आज मनोज जरांगे यांना पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह होत आहे. त्यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यावेळी सहकारी आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह करत जरांगेंना पाणी पाजलं. मनोज जरांगे यांनी एक ग्लास पाणी घेतलं. आंदोलक, सहकारी मित्र आणि महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रहानंतर त्यांनी पाणी घेतलं.