जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

0
136

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी जानेवारी महिन्यात मनोज जरांगे पाटील आपल्या लाखो सहकार्यांसह मुंबईत धडकले तेव्हा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या त्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले व आंदोलन स्थगित केले.

सगे सोयरे यांना जात दाखले देण्याचा अध्यादेश काढला त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे तसेच अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आरक्षण आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, सरकारने मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी मागणी साठी जरांगे पाटील गेल्या पाच दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करत आहेत तसेच त्यांनी औषधोपचार सुद्धा नाकारलेला आहे यासाठी त्यांना पाठिंबा म्हणून पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, निघालेल्या दुचाकी रॅलीची सुरवात डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून तसेच अभिवादन करून करण्यात आली. सदर रॅली डांगे चौक, काळेवाडी फाटा, रहाटणी, पिंपरीगाव मार्गे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे आली. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर रॅली चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी मार्गे भक्ती शक्ती समूह शिल्प येथे आली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर व मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. समूह शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळेस प्रकाश जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व रॅलीचा समारोप करण्यात आला. जीवन बोराडे व मावळ तालुका सकल मराठा समन्वयक मुरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रॅली यशस्वी करण्यासाठी सतिश काळे, प्रकाश जाधव, सचिन बारणे, मारूती भापकर, सुनिता शिंदे, वैभव जाधव, मीरा कदम, वसंत पाटील, गणेश देवराम, किरण खोत, संतोष शिंदे, रावसाहेब गंगाधरे, पांडुरंग परचंडराव, रमेश कदम, हरेश नखाते, ओमकार देशमुख, निलेश बदाले, सदाशिव लोभे, श्रीकांत गोरे, ज्ञानेश्वर लोभे, गणेश दहिभाते, गणेश देवराम, गणेश भांडवलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.