नृत्यकला मंदिर संस्थेच्या ६० विद्यार्थिनींनीची नृत्यांजली

0
132

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – निगडी येथील नृत्यकला मंदिर संस्थेच्या ६० विद्यार्थिनींनी गुरु तेजश्री अडिगे यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यांजली कार्यक्रम सादर तेकेला. नृत्य मंदिर संस्थेकडून भरतनाट्यम चा सहा वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे जाणाऱ्या विद्यार्थिनींनी हे सादरीकरण केले.

सर्वप्रथम श्लोक श्री गणेश गुरु आणि नटराज यांना नमन करणारा श्लोक सादर केला.
सृष्टीला नमन करणारी पुष्पांजली सादर केली.
मूळ पद्धतीने अडव हे पहिल्या त्या दुसऱ्या वर्षातील शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी सादर केले.
तसेच तिसरे वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींनी आलारिपू ही रचना सादर केली. त्यानंतर सरस्वती कौतुकम मैत्रेयी जोशी
जतीस्वरम वर्ष सातवे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी
वर्णम 5 वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी पदम ह्या रचना सिंथिया पवार आणि संस्कृती मगदूम यांनी सादर केले. या विद्यार्थिनी गेली बारा वर्ष संस्थे कडून प्रशिक्षण घेत आहे.
सहावे वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींनी तिल्लाना या उत्साह पूर्ण रचनेचे सादरीकरण केले.
अयोध्येतील राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठाला अर्पण करण्याकरिता मंगलम ही रचना खास श्री रामचंद्र कृपाळू भजमन या भजनावर विद्युलता खत्री सर्व अनुभवी विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले.

कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून
मानसोपचार समुपदेशक डॉ जयश्री फडणवीस, १८३ वर्ल्ड रेकॉर्ड असलेले
डॉ दीपक हरके, लायन्स क्लब ऑफ तळेगाव चे अध्यक्ष डॉ अनिकेत काळोखे
यांच्या हस्ते प्रथम वर्ष ते सातवे वर्ष अभ्यासक्रम पुढे नेणाऱ्या विद्यार्थिनींचा अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नृत्य परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त मिळविणाऱ्या मुलींचा प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ असे अनुक्रमे बक्षीस देवून सन्मान करण्यात आला.

वर्षे पहिले
समृद्धी गायकवाड, आनन्या कुलकर्णी,गायत्री शेडगे,रेयांशी भोसले,काव्या पांढरकर(उत्तेजनार्थ विभागून)

वर्षे दुसरे
अवनी पाटील,अलंकृता देसाई, काव्या कुलकर्णी,हेतल लोखंडे(विभागून)
तिसरे वर्षे
तनिष्का आचार्य, आराध्या इनामदार,आर्या पाटील

५ वे वर्षे
आर्य कुलकर्णी,अनवी भामरे,
श्रीनीधी राजगोपालन,
वैभवी शिंदे अशिता भोंडवे(उत्तेजनार्थ विभागून)

वर्षे ७ वे माहेश्वरी जोशी
अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थिनी
लहेर मृण्मयी मेरुकर, शार्वी,

डॉ.फडणवीस म्हणाल्या कि,नृत्य हे मनसिक व शारीरिकदृष्ट्या हे निरोगी ठेवते.
अभ्यासक्रमाबरोबर हे घेतलेले नृत्याचे प्रशिक्षण हे आयुष्यभर उपयुक्त ठरते.
ताल चुकला कि तोल जातो. आयुष्याचा समतोल कायम ठेवण्यासाठी तोल आणि ताल यांचा समन्वय साधावा लागतो.

डॉ. हरके म्हणाले कि, पालक प्रोत्साहन देतात हे महत्त्वाचे आहे. नृत्यकला मंदिर हि संस्था
हे प्राचीन कलेचा प्रसार व प्रचार करीत आहे.हि कौतुकास्पद बाब आहे. लवकरच या विद्यार्थ्यांना घेवून एक रेकॉर्ड करायचा आहे.

डॉ. काळोखे म्हणाले कि, भरतनाट्यम हि प्राचीन कला आहे. भरतनाट्यम हि भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे तो टिकून ठेवण्याची कलाकार प्रयत्न करीत आहे. हल्ली विद्यार्थ्यांचा बॉलिवूड नृत्य शिकण्याकडे अधिक कल असताना पालकांनी भरतनाट्यमची निवड केली हे कौतुकास्पद बाब आहे.
नृत्यामुळे व्यायाम आणि मानला आनंद मिळतो.
आणि जो निरोगी राहतो.
यावेळी गुरु अडीगे म्हणाल्या कि, यंदा नृत्यकला संस्था २९ वर्षाची झाली. प्रशिक्षणामध्ये सातत्य ठेवल्यास यशाची शिखरे गाठता येतात.नृत्यामुळे आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. नृत्यामुळे माझाही आत्मविश्वास वाढला त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करीत आहे.लोकनृत्यासाठी देखील कार्य करीत आहे.

यावेळी अंशिता बारगळ हिला कलासक्त पुरस्कार विद्यार्थिनी म्हणून तर शर्वरी खत्री या विद्यार्थिनीला सातत्याने नृत्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेने पुढील प्रशिक्षणासाठी स्कॉलरशिप जाहीर केली.
दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक संचालनात सहभागाबद्दल वीणा भोसले हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

नृत्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल अंशिता बारगळ,लेहर मित्तल,शार्वी कळसकर,मृण्मयी मेरुकर, अनौष्का बिश्वास,पूर्वा जंगले यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रासंचालक ऱत्ना दहिवेलकर यांनी केले. तर आभार अविनाश अडीगे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी नृत्य सहाय्य वैष्णवी शर्मा, संस्कृती मगदूम आणि विद्युलता खत्री यांनी केले. तसेच कार्यक्रमा च्या यशस्वीते करिता प्रशांत शिंदे,पंकज ओव्हाळ, तुषार जंगले, अश्विनी बारगळ,हर्षा जंगले यांनी परिश्रम घेतले.