रस्ता ओलांडताना महिलेला पिकपची धडक; महिलेचा मृत्यू

0
123

मोशी, दि. ५ (पीसीबी) – रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला पिकपची धडक बसली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजता पुणे-नाशिक महामार्गावर, मोशी येथे घडली.

धोंडाबाई बाबू खरात (वय 61, रा. आदर्शनगर, मोशी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दीपक बाबू खरात (वय 34) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकप (एमएच 14/जेएल 5287) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खरात यांची आई धोंडाबाई पुणे-नाशिक महामार्गावर आदर्शनगर येथे पीएमपी बस थांब्याजवळ रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भोसरीकडून मोशीच्या दिशेने जाणाऱ्या पिकप चालकाने त्याच्या ताब्यातील पिकपने धोंडाबाई यांना जोरात धडक दिली. यामध्ये धोंडाबाई खरात गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.