शेअर्स खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची 23 लाख 40 हजारांची फसवणूक

0
116

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – शेअर्स खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून पैसे घेत त्याची 23 लाख 40 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 4 डिसेंबर 2023 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

संतोष एकनाथ गायकवाड (वय 47, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकांरी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9718352450, 447404971223, 447405484888, 447405911437 मोबाईल क्रमांक धारक तसेच बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी pantheon ventures llp ltd या नावाची कंपनी असून त्या कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, अशा प्रकारची जाहिरात सोशल मिडीयावर दिली होती. ती जाहिरात फिर्यादी गायकवाड यांनी पाहिली. त्यानंतर आरोपींसोबत संपर्क झाल्यानंतर आरोपींनी गायकवाड यांना शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. पैसे कमावण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी शेअर्स खरेदी करण्यासाठी गायकवाड यांच्याकडून आरोपींनी 24 लाख रुपये घेतले. दरम्यान आरोपींनी गायकवाड यांना 60 हजार रुपये परत दिले. उर्वरित 23 लाख 40 हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.