चाकण, दि. ५ (पीसीबी) – दोन कोटी रुपयांचे कर्ज देतो, असे सांगून व्यावसायिकाच्या दोन बँक खात्यांची अफरातफर केली. याप्रकरणी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 सप्टेंबर 2023 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयसीआयसीआय बँक, चाकण शाखेत घडला.
महेश चौगुले (रा. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुधीर एकनाथ इंगळे (वय 41, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौगुले याने फिर्यादी इंगळे यांना ‘दोन कोटी रुपयांचे कर्ज देतो. त्या मोबदल्यात कर्ज रकमेच्या पाच टक्के कमिशन द्यायचे. बँकेच्या खात्याला माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड राहील, अशी अट घातली. त्यानंतर इंगळे यांच्या आयसीआयसीआय बँकेतील दोन खात्यांना चौगुले याने स्वताचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड ठेवून खात्याची अफरातफर करत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.












































