हिट अँड रन कायदा मागे घ्या ; अन्यथा दिल्ली चक्काजाम करू : बाबा कांबळे

0
166

केंद्र सरकारने हिट अँड रन हा जुलमी कायदा देशभरातील चालक-मालकांच्या माथी मारला आहे. त्या कायद्याअंतर्गत चालकांना दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड होणार आहे. या कायद्याला सध्या स्थगिती दिली आहे. मात्र कायदा अद्यापही मागे घेण्यात आलेला नाही. हा कायदा जोपर्यंत मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहू. हिट अँड रन कायदा मागे घ्या. सरकारने आमच्या मागण्या मंजूर करून आमच्याशी चर्चा करावी. अन्यथा दिल्ली जक्काजाम करू, असा इशारा ऑटो रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.

देशभरातील 25 कोटी चालक-मालकांच्या प्रश्नांसाठी दिल्ली येथे लवकरच देशव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील सर्व राज्यातील चालक-मालक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. या निमित्त बारामती येथे एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चालक-मालकांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे यांनी इशारा दिला.

बारामती येथे जय हिंद चालक-मालक संघटनेच्या वतीने एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आला होता. संघटनेचे अध्यक्ष आरिफ भाई खान या मेळाव्याचे अध्यक्षपदी होते. ज्येष्ठ नेते शंकरदादा चिंचक,प्रकाश दंडगव्हाण, सुनिल गंगावणे,आदी सह पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रातील विविध राज्यातील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, हिट अँड रन कायदा मागे घेतला पाहिजे. तसेच देशातील 25 कोटी चालक-मालकांच्या हितासाठी सरकारने आयोग गठीत केला पाहिजे. देशातील चालक मालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी वेल्फर बोर्ड निर्माण केले पाहिजे. देशात चालक-मालकांसाठी ‘ड्रायवर डे’ साजरा केला पाहिजे. देशातील बॉर्डरवर व आरटीओ कार्यालयामध्ये होणारी चालकांची लूट आणि घुसखोरी थांबली पाहिजे. या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे.

अध्यक्षीय भाषणात आरिफभाई खान म्हणाले की, बारामती हे देशाचे राजकीय व सामाजिक केंद्र आहे. यामुळे आम्ही बारामती येथे हा मेळावा आयोजित केला आहे. बाबा कांबळे यांनी देशभरामध्ये ड्रायव्हर जोडो यात्रा सुरू केली आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये 20 हजार किलोमीटर गाडीने ते प्रवास करणार आहेत, दिल्लीमध्ये होणाऱ्या त्यांच्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी आम्ही देखील सहभागी होणार आहोत. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी दाद मिसळ,महेश खवळे ,अंबर वाळके, दत्तात्रय कांबळे, बापू कांबळे,रंगनाथ शिंगाडे, अमोल गांगुर्डे, राहुल पोमाणे, चांगदेव बागडे, राहुल गव्हाणे, अकबर शेख, नितीन मानकर, आनंदा ओवाळ, दादासाहेब भोसले, भाऊसाहेब भिसे, असलम शेख, यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया :

आमच्या मागण्या बाबत सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जात नाही. मागण्या मान्य न झाल्याने दिल्लीत आंदोलन करणार आहे. मागण्यांबाबतचे निवेदन केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला पाठवण्यात आले आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली येथे देशभरातील सर्व चालक-मालक उपस्थित राहून अधिक तीव्र आंदोलन छेडणार आहे.

– बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक चालक मालक फेडरेशन

अधिक माहितीसाठी संपर्क

  • बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक चालक मालक फेडरेशन
  • मो. नं : 9850732424