बांधकाम, पर्यटनाला चालणा देणारे अंदाजपत्रक

0
265

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – बांधकाम व्यवसाय, पर्यटन व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, आणि शेती आणि शेत मालावर प्रक्रिया करणारे व्यवसाय यांना चालना देणारे हे अंदाजपत्रक आहे.

कर दात्याने आयकर पत्रक भरल्यावर त्यास आयकर परतावा मिळण्यासाठी लागणारा सरासरी कालावधी हा 90 दिवसावरून 10 दिवसापर्यंत आलेला आहे, असे मत पिंपरी चिंचवड सीए संघटनेचे माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी यांनी व्यक्त केले आहे.

ज्या करदात्यांना आयकर विभागाकडून मागील आर्थिक वर्ष 2010 रु 25000 आणि आर्थिक वर्ष 2011 ते 2015 रु 10000 पर्यंत नोटीस आलेल्या आहेत. त्यांचा भरावा लागणारा कर माफ करण्यात येणार आहे, असे जवळजवळ एक कोटी करदाते आहेत. त्यांना दिलासा मिळणार आहे. या वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्या कारणाने भरपूर वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुका झाल्यावर परत जून जुलै महिन्यात अंदाजपत्रक सादर करावे लागेल, ते पुढील आर्थिक वर्षाच्या दृष्टीने महत्वाचे असेल.